Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर

बेलवडे खुर्द ः निवडणूक निकालानंतर जल्लोष करताना बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार. मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने उडवि

महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध
स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- कृषिमंत्री दादाजी भुसे
’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?

मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने उडविला पाटणकर गटाच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा
कराड / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील खुर्द येथील बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 20 वर्षाच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 12 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडविले.
पाटण तालु्क्यातील बेलवडे खुर्द विकास सेवा सोसायटीवर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर करून आपला झेंडा फडकवला. एकूण 12 जागेपैकी 11 जागा जिंकून परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी पाटणकर गटाचा धुव्वा उडविला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत सत्ताधारी पाटणकर गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजया पवार, अलका पाटील, गोविंद कांबळे, यशवंत कवर, अधिक पवार, आनंदा पवार, बंडू पवार, श्यामराव सोनार, राजाराम पवार, राजेंद्र पवार, हणमंत पवार आदी उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सर्व विजयी उमेदवारांचे मंत्री शंभूराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई यांनी अभिनंदन केले. दरम्यान, सत्ताधारी पाटणकर गटाच्या बेलजाईदेवी ग्रामविकास पॅनेलचे बबन पांडूरंग पवार हे केवळ एक उमेदवार या निवडणूकीत विजयी झाले.

20 वर्षानंतर पाटणकर गटाला भगदाड
बेलवडे विकास सेवा सोसायटीवर गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाची तब्बल 20 वर्षे सत्ता होती. मात्र, यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि मनसे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने 12 पैकी 11 जागावर दणदणीत विजय मिळवून विरोधी पाटणकर गटाच्या 20 वर्षाच्या सत्तेला भगदाड पाडून सत्तांतर केले.

COMMENTS