Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणुसकी हा धर्म समजून सर्वांगीण विकास केला

उदगीर प्रतिनिधी - माणुसकी हा धर्म समजून तालुक्यात सर्वागिंण विकास केला असून महादेव मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन क्रीड

जरे हत्याकांडाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवा
कशेडी घाटात कोसळली दरड; 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
बदलापुरात तरुणावर तलवारीने वार

उदगीर प्रतिनिधी – माणुसकी हा धर्म समजून तालुक्यात सर्वागिंण विकास केला असून महादेव मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा, युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी केले. उदगीर तालुक्यातील शंभु उबंरगा येथे आयोजीत अधिकमासानिमित्त सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व 2100 सदभक्तांचा परमरहस्य पारायण सोहळ्यात ते बोलत होते. बनसोडे म्हणाले की, तालुक्यातील शंभु उंबरगा गावातील महादेवाचे मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या भागातील हजारो नागरीकांचे ते ग्रामदैवत आहे. मी आध्यत्माला मानणारा कार्यकर्ता असून भक्ती हीच खरी शक्ती आहे.
समाजात नैतिक, धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे काम कीर्तनातून होत असते. यामुळे पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असतात. गेल्या साडेतीन वर्षात मतदार संघाचा झपाट्याने विकास केला. उदगीर – जळकोट तालुक्यासह ग्रामीण भागातील मूलभूत गरजा पूर्ण करुन शहराला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार केले. यामुळे आपण आज शहरात व ग्रामीण भागात वेगाने पोहचत आहोत. आज अधिकमासानिमित्त पंचक्रोशीतील भक्त या अखंड शिवनाम सप्ताहाला येवू शकले. आपण दिलेल्या मतामुळेच मला दोन वेळा मंत्री पदाची संधी मिळाली असून मला जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असला तरी माझा राजकीय जन्म उदगीरकरांनीच दिला आहे. याप्रसंगी उदगीरचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, हानेगावचे शंकरिंलंग शिवाचार्य महाराज ,बसविंलग शिवाचार्य महाराज, निळकंठ शिवाचार्य महाराज, शिवराज नावंदे, भगवंतराव पाटील चामरगेकर, राजेश्वर स्वामी महाराज, दिलीप स्वामी महाराज, शिविंलंग पाटील किनीकर, रामदास पाटील सुमठाणकर, सभापती शिवाजी हुडे, प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील, श्याम डावळे, शिवानंद हैबतपुरे, ज्ञानेश्वर पाटील , माधवराव बर्गे, शंकरराव मोरगे, गौतम पिंपरे, विवेकानंद स्वामी, वीरभद्र महाराज, रामिंलंग महाराज, शिवकांत स्वामी, कैलास जामकर, विठ्ठल चव्हाण, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत , बांधकाम विभागाचे उपाभियंता एल.डी. देवकर, वसंत पाटील, गजानन बिरादार, लिंगेश्वर स्वामी आदी उपस्थित होते. उदगीर शहरात 7 कोटींचे वीरशैव लिंगायत भवन उभारण्याचे काम सुरू आहे तर जंगम समाजाच्या मागणीनुसार रेणुकाचार्य संस्कार भवनची आपण निर्मिती करीत आहोत. मी निवडून आल्यानंतर रात्रीचा दिवस करुन मतदार संघाचा विकास केला. या भागात दळणवळण वाढविले. माय माऊंलीना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते म्हणून मी जलजीवन मिशन व वाटरग्रीडची योजना आणली. मी काम करणारा कार्यकर्ता आहे बोलणारा नाही अशी ग्वाहीबनसोडेंनी उपस्थित नागरिकांना दिली. माझ्या मागील कार्यकाळात हत्तीबेट पर्यटन स्थळाला व डोंगरशेळकी मंदिराला ‘ब’ दर्जा मिळवुन दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS