Homeताज्या बातम्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहात्यात ‘मॅरेथॉन २०२६’ चा थरार; शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राहाता : जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहाता नगरपरिषदेच्या वतीने आयोजित “मॅरे

“न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा वकीलच यशस्वी होतो” – भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा; राहात्यात ॲड. संदीप पुंड यांचा गौरव
राहाता ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव; रुग्णांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

राहाता : जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहाता नगरपरिषदेच्या वतीने आयोजित “मॅरेथॉन २०२६” या भव्य धावस्पर्धेला शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यासह नाशिक व इतर जिल्ह्यांतील नामांकित धावपटूंच्या सहभागामुळे रविवारी राहाता शहरात संपूर्ण क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

या स्पर्धेत तरुणांसह बालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. पहाटे ६ वाजता सुरू झालेली ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा तीन वेगवेगळ्या गटांत पार पडली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालिका कर्मचारी आणि नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून विशेष परिश्रम घेतले होते.

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतिम निकाल खालीलप्रमाणे :

  • १० किलोमीटर गट : कमलाकर देशमुख (प्रथम), रोहित बिन्नर (द्वितीय), विशाल बनसोडे (तृतीय).
  • ५ किलोमीटर गट : वैभव शिंदे (प्रथम), अनिल जाधव (द्वितीय), ईश्वर झिरवळ (तृतीय) – या दोन्ही गटांतील सर्व विजेते नाशिक जिल्ह्यातील आहेत.
  • ३ किलोमीटर (मुले) : कृष्णा बोऱ्हाडे (प्रथम – नाशिक), राजवीर केता (द्वितीय – छत्रपती संभाजीनगर), साईराज मुरादे (तृतीय – खडकेवाके).
  • ३ किलोमीटर (मुली) : साक्षी कसबे (प्रथम – नाशिक), अंजली पंडित (द्वितीय – नाशिक), खुशी हसे (तृतीय – संगमनेर).

स्पर्धेतील सर्व यशस्वी विजेत्यांचा धनश्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते आकर्षक पारितोषिक व रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

COMMENTS