पाथर्डी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ वितरणाचा संयुक्त मेळावा आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या.यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ डिसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, सरपंच मोनाली राजळे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नोंदणीकृत बांधकाम कामगार उपस्थित होते.या मेळाव्यात ८६४ बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने असंघटित बांधकाम कामगारांसाठी अनेक लोकाभिमुख व कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ आता तळागाळातील कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. बांधकाम कामगार हा समाजाच्या विकासाचा कणा असून त्यांच्या कष्टाला सन्मान देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. प्रत्येक पात्र कामगाराने मंडळाकडे नोंदणी करून शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा तसेच आर्थिक सहाय्याच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील एकूण १५,५८५ लाभार्थ्यांना १९ कोटी २९ लाख ८८ हजार ३०० रुपयांचे थेट अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले.यामध्ये शेवगाव तालुक्यातील ५,५६१ लाभार्थ्यांना ६ कोटी ३९ लाख २० हजार १५० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. त्यामध्ये ५,४३३ शैक्षणिक लाभ, ८७ सामाजिक सुरक्षा, १९ आरोग्यविषयक आणि २२ आर्थिक सहाय्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.तसेच पाथर्डी तालुक्यातील १०,०२४ लाभार्थ्यांना १२ कोटी ९० लाख ६८ हजार १५० रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले. त्यामध्ये ९,७५१ शैक्षणिक लाभ, २०९ सामाजिक सुरक्षा, ३३ आरोग्यविषयक आणि २४ आर्थिक सहाय्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.अर्थसाहाय्यासोबतच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व गृहपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. शेवगावमधील १४ हजार आणि पाथर्डीमधील १२ हजार अशा एकूण २६ हजार कामगारांना सेफ्टी शूज, हेल्मेट, जॅकेट, सोलर टॉर्च, मच्छरदाणी आदींचा सुरक्षा संच देण्यात आला. तसेच शेवगावमधील ९ हजार आणि पाथर्डीमधील ८ हजार अशा एकूण १७ हजार कामगारांना स्वयंपाकघरासाठी गृहपयोगी भांड्यांचे संच वितरित करण्यात आले.

COMMENTS