Homeताज्या बातम्या

उद्यापासून दोन दिवस अंशतः अनुदानित शाळा ‘बंद’

 शेवगाव : अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ व ८ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची

उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन; आझाद मैदानावर ढोर-कक्कया समाजाचे शक्तीप्रदर्शन
माझगाव न्यायालय इमारत व डेअरी प्रकरणातीलकथित गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी : संजय पाटीलअन्यथा 10 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच
Why will schools in Maharashtra remain closed for two days Nagpur news |  दोन दिवस राज्यातील शाळा बंद राहणार?, शिक्षक संचालकांचे पत्र आणि....

 शेवगाव : अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ व ८ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांमधील अध्यापनाचे कामकाज दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन तीव्र निदर्शने करणार आहेत.शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सांगण्यात आले की, गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे, त्रुटींची पूर्तता केलेल्या संस्थांना न्याय देणे, आवश्यक निधीची तातडीने तरतूद करणे तसेच शिक्षकांना सेवाशाश्वती प्रदान करणे या प्रमुख मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासने आणि समित्यांच्या घोषणांपलीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समान जबाबदाऱ्या पार पाडूनही अंशतः अनुदानित शिक्षकांना आर्थिक आणि प्रशासकीय न्यायापासून वंचित राहावे लागत आहे. अपुऱ्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, हा लढा केवळ आर्थिक मागण्यांसाठी नसून शिक्षण व्यवस्थेच्या सन्मानासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हे आंदोलन विद्यार्थ्यांविरोधात नसून शासनाच्या विलंबाच्या धोरणाविरोधात असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. शेवगाव तालुक्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने तातडीने निधीची तरतूद करून स्पष्ट शासन निर्णय जाहीर करावा, अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक समन्वय संघाने दिला आहे.

COMMENTS