Homeताज्या बातम्या

पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा

मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आह

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा!
महायुतीतील अस्वस्थता!
पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ही केवळ सुरुवात, आगामी अनेक वर्षे देशात भाजप आणि एनडीएचेच शासन राहील – अमित शाह


मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र या निर्णयानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. या प्रकरणातील कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून निकालाला आव्हान देण्यासाठी पुढील पावले उचलण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करत हायकोर्टात दाद मागण्याची मागणी केली. 3 जून 2006 रोजी तत्कालीन राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबई येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे वाहनचालकही मृत्युमुखी पडले होते. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातीच्या तपासावर विविध प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. अखेर सत्र न्यायालयाने नुकताच निकाल देत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. निकालानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेत्यांनी न्यायालयीन निकालाबाबत नाराजी व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याची भावना मांडली. तर काहींनी तपास आणि पुराव्यांच्या सादरीकरणाबाबत प्रश्‍न उपस्थित केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या निकालाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, राजकीय वैमनस्यातून घडलेल्या गंभीर गुन्ह्यात आरोपींची मुक्तता झाल्याने सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अशा प्रकरणांत सत्य बाहेर येणे आणि न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, पक्षातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबतही भूमिका मांडली. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

COMMENTS