Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः पिंपरी चिंचवडमधील चिखली भागात बुधवारी सकाळी पहाटेच्या एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत चार जणांचा जळून मृत्यू

संगमनेर बसस्थानक परिसरात साचले पाणीच पाणी
संघर्ष धान्य बँकेकडून के.प्रा.शा वसाहत बाग पिंपळगाव येथील शाळेत चार हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप
आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

पुणे/प्रतिनिधी ः पिंपरी चिंचवडमधील चिखली भागात बुधवारी सकाळी पहाटेच्या एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत चार जणांचा जळून मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र, पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमणाराम चौधरी (वय 45), ज्ञानुदेवी चौधरी (वय 40), सचिन चौधरी (वय 10) आणि भावेश चौधरी (वय 15) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चिखली येथील सचिन हार्डवेअरला बुधवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली. या दुकानात हे कुटुंब राहत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानाला लागलेली आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा चौघेही साखर झोपेत होते. दुकानातील साहित्याने वेगाने पेट घेतल्याने त्यांना बाहेर देखील पडता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कुलिंगचे काम सुरू असतांना अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना चार मृतदेह आढळले. यात एक पुरुष आणि महिला तसेच दोन लहानमुलांचा समावेश होता. सध्या आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.

COMMENTS