Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार

माजलगांव । प्रतिनिधीमाजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची काही दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा माजलगांव

Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)
बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
डॉ. आदित्य सोन्नर एमडी (स्किन) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

माजलगांव । प्रतिनिधी
माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची काही दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा माजलगांव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारण्यास सांगितले गेले. हा निर्णय शहरवासीयांसाठी आनंददायक ठरला असून, सर्व स्तरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शहरातील कायदा सुव्यवस्था सक्षमपणे हाताळण्याची क्षमता असलेले दबंग पोलीस निरीक्षक पुन्हा माजलगांव शहरात रुजू झाल्याने माजलगांव पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. सत्कार सोहळ्यात बीड लोकरंजन चे संपादक परमेश्वर सोळंके, बाळासाहेब आडागळे, संतोष रासवे, पृथ्वीराज निर्मळ, बालासाहेब उफाडे, फेरोज पठाण, नाजर कुरेशी, महादू बप्पा ताकट, भास्कर जाधव (सरपंच), महादेव आढाव (हे.स.सो.स.) आदी उपस्थित होते.

COMMENTS