Homeताज्या बातम्या

‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा मोठा इफेक्ट! बालमटाकळीतील आमरण उपोषणाची दोन दिवसांतच दखल

https://www.youtube.com/watch?v=wS84xa1Pf4Y अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. 'लोकमंथन न्यूज २४'च्

मनपा पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक करा, धिंड काढा-कर्मचार्‍यांचा संताप उसळला; खडकपुरा-वाघी रोडवरील घटनेचा तीव्र निषेध; मनपा प्रवेशद्वारासमोर निषेध सभा
नांदेड शहरात रस्त्यावरच कायद्याची धज्जी! ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी, तरुणाला उघड धमक्या; व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला
NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध मालमत्तेवर थेट हातोडा। लोकमंथनNews२४

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. ‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा एक मोठा प्रभाव पाहायला मिळाला असून, बालमटाकळी येथील शेत रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात पुकारलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी या शेत रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला भर टाकून अतिक्रमण केले होते. यामुळे या रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली होती, ज्याचा मोठा फटका स्थानिक वाहनधारक आणि इतर शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरून कांबी रस्त्याकडे जाणाऱ्या ओढ्याच्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन, एक महिन्याच्या आत रस्त्याची हद्द निश्चित करून संपूर्ण अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

COMMENTS