Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापारी जागेसाठी 30 जून रोजी भव्य मोर्च्या 

मोठ्या संख्येने सहभागी व्हा. - प्रा. हनुमंत भोसले

केज प्रतिनिधी - केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर छोटे व्यापारी व टपरिधारक व्यवसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असणा

सर्वसामान्यांच्या मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप सरकार कुठलाही विषय पुढे करीत आहे – नाना पटोले
मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना ! विजेचा शॉक लागून ४ जणांचा मृत्यू
दिंडोरी – बालभारतीच्या भांडारातून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त

केज प्रतिनिधी – केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर छोटे व्यापारी व टपरिधारक व्यवसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असणारे व्यवसायिक व कुटुंबीय यांची प्रचंड उपासमार सुरू झाली आहे. आता या व्यवसायिकांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देणे गरजे चे आहे. केज नगरपंच्यायत कडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. केजमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा मुख्य रस्त्यालगत केवळ शासकीय विविध कार्यालयाच्या जागा आहेत. या शासकीय जागेवर रस्त्यालगत नियम व अटी अंतर्गत गाळे काढून या व्यापार्‍यांना शासकीय कायदे व नियमाच्या अधीन राहून हे गाळे किरायाने दिल्यास व्यवसायिकांची गरजही भागेल व शासनाला आर्थिक प्राप्तीही होईल. यासाठी केज विकास संघर्ष समितीने अगदी पहिल्याच दिवशी केज पंच्यायत समितीकडे गाळे बांधण्यासाठी मागणी केली आहे. याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शासनाने बांधा-वापरा- हस्तांतरीत करा या धोरणाचा अवलंब केला आहे. याची केजला खूप गरज आहे. या प्रस्तावाला गती देऊन येत्या सहा महिन्यात हे गाळे तयार व्हावेत व व्यावसायिकांना उपलब्ध करावेत या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या शुक्रवार दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्च्याचे आयोजन करत आहोत. शासनाला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी या मोर्च्यात केज शहरातील छोटे व्यापारी, टपरिधारक व अतिक्रमण उठल्यामुळे रस्त्यावर आलेले दुकानदार व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी तसेच समाजप्रेमी नागरिकांनी फार मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS