Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चितपट कुस्त्यांना मिळाली टाळ्या-शिट्ट्यांची दाद

दावल मालिक बाबा यात्रेत रंगला हगामा

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे चितपट कुस्त्यांनी यात्रेची सांगता झाली. लाल मातीत रंगलेल्या या चितपट कुस्त्यांना कुस्ती शौक

नगर अर्बन बँकेवर गणेश गायकवाड यांची अवसायक म्हणून नियुक्ती
सारसनगरला बंद घर फोडले, दागिन्यांची चोरी
अडत्याला वीस लाखाचा चुना ; व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे चितपट कुस्त्यांनी यात्रेची सांगता झाली. लाल मातीत रंगलेल्या या चितपट कुस्त्यांना कुस्ती शौकिनांनी टाळ्या व शिट्ट्यांची दाद दिली. वडगाव गुत्ता येथे दावल मालिक बाबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी हगाम्यात निकाली कुस्त्यांनी हगामा रंगला. यात सहभागी नामवंत पहिलवानांनी काही क्षणातच कुस्त्या चितपट केल्या.

वडगाव गुप्ता ( ता.नगर ) येथे दावल मालिक बाबाच्या दोन दिवस यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेच्या दिवशी सकाळी बाबांची महापूजा करण्यात आली. संध्याकाळी वाजत गाजत छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. दुसर्‍या दिवशी जंगी हगामा झाला. या हगाम्यात नामवंत पहिलवानांनी हजेरी लावत कुस्त्यांच्या विविध डावपेचांचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डीले, सरपंच विजय शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शाम पिंपळे, माजी पंचायत समिती सदस्य राजू शेवाळे, बाबासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते कुस्त्या लावण्या आल्या. हगाम्याचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.

यावेळी कर्डीले म्हणाले, दिवसेंदिवस कुस्त्यांचे आखाडे बंद पडत चालले आहे. मात्र, वडगाव येथील ग्रामस्थ यात्रा कमिटीने हगाम्याची परंपरा टिकवून ठेवली आहे. यावेळी शिवाजी घाडगे, जालिदर डोंगरे, डॉ. बबन डोंगरे, बाबासाहेब डोंगरे, गणेश डोंगरे, बबन कोर्‍हाळे, उमेश डोंगरे, सावित्राम गुडगळ, हुसेन सय्यद, वजीर सय्यद, बापूसाहेब गव्हाणे, नारायण शिंदे, प्रल्हाद डोंगरे, भीमराज डोंगरे, शंकर शेळके, प्रकाश गव्हाणे, किसन शेवाळे, अशोक शेळके, दीपक गिते, विवेक घाडगे, भानुदास काळे, सुजीत डोंगरे, भीमराज गव्हाणे, विठ्ठल डोंगरे, दीपक शिंदे, गोरख शेवाळे, अशोक गुडगळ, किसन डोंगरे, संतोष बैरागी, बाळू पोपट डोंगरे, शिवनाथ शेवाळे, विजय डोंगरे उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यात्रेमध्ये खाऊची दुकाने, खेळणी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी रहाटगाडगे यामुळे परिसर गजबजून गेला होता. पोलिस बंदोबस्त मोठया प्रमाणात होता.

COMMENTS