हिदूंची जातीनिहाय जनगणना हिंदुत्ववादी नेते करणार का?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिदूंची जातीनिहाय जनगणना हिंदुत्ववादी नेते करणार का?

हिंदू हितरक्षणासाठी हनुमान चालिसाची रट लावून ओबीसी हिंदू युवकांची टाळकी भडकावणाऱ्या राजकीय नेत्यांनी हिंदू धर्मातील उच्चजातीय अल्पसंख्य समाज बहुसंख्य

जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या
मुंबई ते पुणे, नाशिकमध्ये कॅबच्या भाड्यात वाढ
नांदगावमध्ये ’शितल क्लिनिक’चा शुभारंभ

हिंदू हितरक्षणासाठी हनुमान चालिसाची रट लावून ओबीसी हिंदू युवकांची टाळकी भडकावणाऱ्या राजकीय नेत्यांनी हिंदू धर्मातील उच्चजातीय अल्पसंख्य समाज बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या समाजाच्या तरूणांना आपले सैन्य म्हणून वापरत आला आहे. कारण, रोजी -रोटीला एकवेळा वंचित असला तरी हा युवक आपल्या धर्मश्रद्धा अतिशय तीव्र ठेवतो. त्यामुळे, आज बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण या कोणत्याही क्षेत्राविषयी न बोलणारे, हिंदू म्हणविणारे राजकीय नेते या तरूणांना भडकविण्याचे काम गेली सात दशकांपेक्षा अधिक काळापासून करित आहेत. नुकताच महाराष्ट्रात सुरू केलेला हनुमान चालिसाचा जप इतर धर्मियांच्या द्वेषाने करण्याचे आव्हान मनसेच्या नेत्यांनी केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नसून आता तर त्यांनी मातोश्री वर हनुमान चालीसा पढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. या मागणीच्या मागे दोन अर्थ संभावित आहे. पहिला म्हणजे शिवसेनेचे हिंदुत्व किती प्रखर आहे हे तपासणे आणि दुसरे म्हणजे नसलेल्या अडचणी निर्माण करणे. वास्तविक राज ठाकरे यांच्याविरोधात आता जे आरोप होऊ लागले आहेत ते म्हणजे त्यांचं संपूर्ण भाषण किंवा बोलणे किंवा मागणी ही भाजपच्या इशाऱ्याने होऊ लागली आहे, असा सार्वत्रिक आरोप आता होतो. राज ठाकरे जन्मदर खरंच हिंदुत्व जोपासायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम हिंदूंच्या जनगणनेची मागणी करायला हवी. कारण हिंदू हा धर्म अनेक जातींचा समुच्चय आहे. परंतु, या जातीतील कोणत्या जातीला काय मिळाले आहे, यावर कोणतीही आकडेवारी आजपर्यंत येऊ शकलेली नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, देशातील उच्चजातीय समुहांना देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीत पूर्णपणे वाटा मिळतो; परंतु, देशातील सर्वात जास्त संख्येने असलेल्या ओबीसी, एससी, एनटी या हिंदू धर्माचे आचरण करणाऱ्या आणि कोणत्याही ब्राह्मण, क्षेत्रीय, वैश्य यांच्यापेक्षा प्रखर धर्मनिष्ठा असणाऱ्या समुहाला काहीही पदरात पडत नाही. त्यामुळे, ओबीसींची जातीय जणगणना करावी अशी मागणी पुढे आली. हिंदू असणाऱ्या या समुदायासाठी हिंदूत्ववादी नेते कांहीही करू शकले नाही! ओबीसी हे हिंदू असताना त्यांच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी अद्यापही पूर्ण केली जात नाही; याचा अर्थ असा होतो की कोणतेही हिंदुत्ववादी राजकारण किंवा हिंदुत्ववादी नेते हे हिंदुधर्मीय ओबीसी असणाऱ्या किंवा एससी, एनटी असणाऱ्या समुदायाच्या हितासाठी कार्य करीत नाहीत. केवळ उच्च जातवर्गीय हिंदूंच्या रक्षणासाठी खालच्या जात समूहातील हिंदु तरुणांना भडकावून त्यांच्या करवी विघातक कृत्य करून घेणे आणि त्या तरुणांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे अशा प्रकारची रणनीती हिंदुत्ववादाच्या नावाखाली आजपर्यंत देशात चालवली गेली आहे. आता या खालच्या जात समूहातील हिंदू तरुणांना आपली जीवन उद्ध्वस्त करायचे नाही तर त्या जीवनाला आकार देऊन समाजासाठी विधायक कामे करायची आहेत ही कामे करण्यासाठी त्या तरुणांच्या माध्यमांना भडकविण्याचे काम मनसेसारख्या नेत्यांनी आणि तथाकथित हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या नेत्यांनीही थांबवले पाहिजे; कारण कोणताही भाग हा लोकसंख्येवर आधारलेला असतो. हिंदुत्ववादी समाज हा ओबीसी असतानाही त्यांच्या हिताचे कोणतेही कार्य आजपर्यंत हिंदुत्ववादी सत्ताधारी राजकारण आणि समाजकारण यांनी केलेले नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद हा खऱ्या अर्थाने या देशातील हिंदू ओबीसी हिंदू एससी, हिंदू एनटी, यांच्या विरोधातच राबवला जातो, हे आजपर्यंतचे जाणवलेले  सत्य आहे आणि हे सत्य आता या हिंदुच्या तरुण पिढीने जाणून घेतलेले असल्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांच्या भडकाऊ भाषणांना किंवा त्यांच्या कृत्यांना बळी पडणार नाही, हे आता या हिंदू तरुणांनी ठामपणे ठरवलेले आहे.

COMMENTS