निपाणा गावातील मुख्य मार्गावर घाणीचे साम्राज्य

Homeताज्या बातम्या

 निपाणा गावातील मुख्य मार्गावर घाणीचे साम्राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बुलढाणा प्रतिनिधी- खामगाव तालुक्यातील निपाणा या गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने घाणीचे साम

Xiaomi ने आपले Redmi Watch 3 लॉन्च केले
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावाआ. मोनिका राजळे ; खरवंडी कासार येथे ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
भाजपाच्या खा. अशोकराव चव्हाण यांनी सिद्ध केले आपले नेतृत्व व कर्तृत्व

बुलढाणा प्रतिनिधी– खामगाव तालुक्यातील निपाणा या गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालीसह रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र त्यासाठी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीची उदासीनता दिसत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे आता तात्काळ या सांडपाण्याची विल्हेवाट लावून काम न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्र गावकऱ्यांनी घेतलाय. तर नाल्यांचे बांधकाम आमदार निधीतून प्रस्तावित असल्याचे ग्रामसेवक विजय चव्हाण यांनी सांगितले आहे.

COMMENTS