मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…

प्रतिनिधी : मुंबईमनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हा राडा करण्यात आला . बॅट आणि लाकडी दांडक्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत

महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

प्रतिनिधी : मुंबई
मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हा राडा करण्यात आला . बॅट आणि लाकडी दांडक्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत.

यादरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी संजय पाटील यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली .

भिवंडी- ठाणे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे .मात्र तरीही कशेळी टोल नाक्यावर टोल वसुली(toll naka in Thane) करण्यात येते, या विरोधात मनसेने काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते .

तसेच जर वेळेवर भिवंडी- ठाणे रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाक्याची तोडफोड करण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून (MNS)देण्यात आला होता .

मात्र मागणी मान्य न करण्यात आल्याने मनसेने आज सकाळी कशेळी टोल नाक्याची तोडफोड करत मोठा राडा केला . यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे .

COMMENTS