Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकमान्य टिळक विद्यालयात ’वृक्षारोपण’

अंबाजोगाई प्रतिनिधी - दि.13 जुलै 2023 बुधवार रोजी रोटरी क्लब लातूर,मिडटाऊनच्या वतीने पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात ’वृक्षारोपण’ आणि ’करिअ

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, स्मृती इराणींचे राज्यसभेत वक्तव्य
पुण्यात कोयत्याने वार करून तरूणाची हत्या
गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला डावलले

अंबाजोगाई प्रतिनिधी – दि.13 जुलै 2023 बुधवार रोजी रोटरी क्लब लातूर,मिडटाऊनच्या वतीने पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात ’वृक्षारोपण’ आणि ’करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र बनकर,सचिव डॉ.अविनाश भोसले,किशोर दाताळ,संचालक विशाल आयाचित,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते उपस्थित होते. यावेळी रोटरीचे संचालक  विशाल आयाचित यांनी विद्यार्थ्यांना ’12वी नंतर करिअरच्या वाटा’ याविषयी सविस्तरपणे कृतीयुक्त मार्गदर्शन केले.यात त्यांनी 12वी नंतर काय? यावर भविष्यात करिअर निवडताना वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा व अन्य क्षेत्रातील विविध शाखांची माहिती दिली.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी दैनंदिन वेळापत्रक तयार करून ध्येय निश्चिती करावी आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून निवडलेल्या करिअरच्या दृष्टीने पाऊल टाकावे असे सांगितले.विविध कृतीद्वारे या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. क्लबचे अध्यक्ष बनकर यांनी सर्वांना रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची ओळख करून देत विद्यालयास क्लबच्या वतीने 25 उपयुक्त भारतीय वृक्ष भेट दिले.सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते सदरील वृक्षांचे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  नितीन चौधरी,आभारप्रदर्शन  ज्ञानेश मातेकर यांनी केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS