Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची लूट

सरकारी डॉक्टरकडून लाच घेतल्याची दिली कबूली

श्रीगोंदा शहर : संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असलेले माजी सैनिक हे फिटनेस सर्टीफिकेटसाठी 20 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे गेले असता डॉक्टर

मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीना कैकाडी समाजाच्या वतीने निवेदन
कर्जतमध्ये पोलिसांवर उचलला हात
मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार | LOKNews24

श्रीगोंदा शहर : संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असलेले माजी सैनिक हे फिटनेस सर्टीफिकेटसाठी 20 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे गेले असता डॉक्टरकडून तपासणी झाल्यानंतर सर्टिफिकेट देण्यासाठी मेजरकडे पैश्यांची मागणी करण्यात आली. मी एक फौजी आहे, मला तपासणीप्रमाणे योग्य सर्टिफिकेट देण्यात यावे यासाठी पैसे का लागतात अशी विचारणा यावेळी मेजरकडून करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर तुम्ही फिट नाहीत असे सर्टिफिकेट देण्यात येईल त्यामुळे पैसे देऊन फिट असल्याचे सर्टिफिकेट घेऊन जा असे या लाचखोर डॉक्टरकडून सांगण्यात आले. तसेच एका कर्मच्यार्‍याचे नाव सांगत त्याच्याकडे पैसे द्यावेत असे बजावून सांगण्यात आले. पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतरच मेजरला आवश्यक सर्टिफिकेट देण्यात आले.
सदर प्रकार मेजरने संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी यांना कळवल्यानंतर वरिष्ठ पदाधिकारी यांकडून सदर लाचखोर डॉक्टरला यासंबंधित जाब विचारन्यात आला. सुरवातीला लाच घेतली नाही असे डॉक्टरकडून सांगण्यात आले. परंतु संभाजी ब्रिगेडने इंगा दाखवत मेजर आणि पैसे देण्यात आलेला कर्मचारीसमोर उभा केल्यानंतर मात्र डॉक्टरने लाच मागितल्याचे व घेतल्याची कबुली दिली. तसेच घेतलेले पैसे परत देत असल्याचे सांगितले.सदर प्रकार अतिशय गंभीर स्वरुपाचा असून सर्वसामान्य जनतेची पिळवणुक करणारा आहे. अशा लाचखोर डॉक्टर्स मुळे वैदेकिय पेशा तसेच सरकारी रुग्णालये बदनाम होत आहेत. याप्रकरणी सदर लाचखोर डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच तात्काळ निलंबन करुन वैद्यकीय सेवेचे लाईसन रद्द करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात येत आहे. योग्य कारवाई न झाल्यास सदर घटनेच्या व्हिडीओ प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियात प्रसिद्ध करुन आवश्यकता पडल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन संभाजी ब्रिगेड करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष इंजि. शाम जरे यांकडून देण्यात आली.

COMMENTS