Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक सतत गैरहजर ग्रामस्थांची तक्रार

गटशिक्षणाधिकार्‍यांची शाळेला भेट, तीनही शिक्षक गैरहजर आढळले

जामखेड ः जामखेड तालुक्यातील मोहा गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतत गैरहजर रा

बायोडिझेल घोटाळा प्रकरणातील साबळे वाटेफळच्या गुन्ह्यात वर्ग
मुळा धरणात बुडताना एकाला वाचवले, दुसऱ्याचा मृत्यू
प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

जामखेड ः जामखेड तालुक्यातील मोहा गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला दि .23 एप्रिल 2024 रोजी सकाळी अचानक भेट दिली असता. पारखे मल्हारी आप्पा, साखरे रजनीकांत रोहिदास, जाधव विजय सुभाष हे तीनही शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले.त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही हेच शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले होते. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही. तसेच माहे मार्च 2024 रोजी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांनी या शाळेची वार्षिक तपासणी केली असता. सर्व मुले अप्रगत दिसून आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अश्या बेजबाबदार शिक्षकांवर कडक कायदेशीर व खात्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी मोहा गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली असून आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS