Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोक्यात दांडा मारून एकाचा खून

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील घटना

कोपरगाव प्रतिनिधी ः गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण

पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या
यवतमाळ मध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या

कोपरगाव प्रतिनिधी ः गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील येसगाव  येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दीपक दादा गांगुर्डे वय 40 वर्ष असे मयत मजुराचे नाव आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी राञीच अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
मयत दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे वय 40 वर्ष धंदा मजुरी (गवंडी काम) राहणार अचानक नगर येसगाव तालुका कोपरगाव याचे आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव तालुका कोपरगाव यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याचा राग येऊन तिघांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण करून आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून खून केला आहे. तसेच फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुरन.441/2023 भादंवि कलम 302,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहे.

COMMENTS