Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशात महाराष्ट्र दिनी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन ः डॉ. करणसिंह घुले

नेवासाफाटा: नेवासा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र दि

डॉ. शेखर पाटील यांच्या पुस्तकाला ‘मसाप’चा पुरस्कार
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना
नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन

नेवासाफाटा: नेवासा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुधवार 1 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत नेवासा शहरातील बाजारतळ प्रांगणात करण्यात येणार असून या शिबिरात खुबा बदली, गुडघा बदली, दुर्बिणीतून करण्यात येणार्‍या शस्त्रक्रिया, मुतखडा प्रोस्टेट या महागड्या शस्त्रक्रिया  मोफत करण्यात येणार  असल्याची माहिती शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक व नेवासा तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
    मोफत शिबिराची वैशिष्ट्ये विषद करतांना डॉ. घुले म्हणाले की नेवासा तालुक्यातील नोंदीत बांधकाम मजुरांसाठी आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून केशरी व पिवळे शिधापत्रिका धारक(रेशन कार्ड धारक) नागरिकांसाठी शिबिरात आरोग्य तपासणी सुविधा देण्यात येणार आहे.शिबिरात तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करतील व पुढील उपचार एसएमबीटी हॉस्पिटल घोटी या ठिकाणी केले जातील. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भूत उपचार पूर्णपणे मोफत केले जातील. योजनेत न बसणार्‍या आजारांवरील उपचार अतिशय माफक दरात एसएमबीटी हॉस्पिटल येथे करून देण्यात येतील.
     शिबिरात खुबा बदली व गुडघा बदली शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून करण्यात येणार्‍या शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे,रुग्णांना तपासणी करून उपचाराविषयीचे नियोजन करण्याचे धोरण असेल, सरसकट सर्व रुग्णांना गोळया औषधे वाटण्यात येणार नाहीत, शिबिरात तपासणी केल्यानंतर उपचारायोग्य सर्व रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी समर्पण फाउंडेशन मार्फत नियमित पाठपुरावा केला जाईल तर शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ, मेडिसिन तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ जनरल सर्जरी, त्वचारोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ या डॉक्टरांचा समावेश असेल तर शिबिरात मोफत आयुर्वेदिक व होमिओपॅथिक सल्ला केंद्र सुविधा उपलब्ध असणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकांनी आपल्या फॅमिली डॉक्टर कडे तर बांधकाम मजुरांनी आपल्या गावातील ठेकेदाराकडे शिबिराविषयी चौकशी करावी, शिबिरासाठी नाव नोंदणी आपल्या गावातील फॅमिली डॉक्टर कडे करण्याची सुविधा उपलब्ध असून शिबिरात येताना रुग्णांनी आपल्या आजाराच्या संबंधीत असलेली जुनी सर्व कागदपत्रे घेऊन यावीत त्यासाठी अधिक माहिती व नाव नोंदणी करता डॉ. करणसिंह घुले  9822773002, अमोल पिंगळे 9226089158, निवृत्ती जाधव पाचेगाव 9890655239 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, या सुविधेचा सर्व गरजू रुग्णांना लाभ मिळावा यासाठी सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोफत महा आरोग्य शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय नेवासा, सार्वजनिक आरोग्य विभाग पंचायत समिती नेवासा, प्रेस क्लब नेवासा, लॅबोरेटरी असोसिएशन नेवासा, समर्पण फाउंडेशन व मजदूर संघ हे देखील यासाठी सक्रिय सहभाग घेऊन शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगदान देणार असून या शिबिराची गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.करणसिंह घुले यांनी तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने केले आहे.

या महाआरोग्य शिबिरात मणक्यांच्या शस्त्रक्रिया,खुबा बदली व गुडघा बदली शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून करण्यात येणार्‍या शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट शस्त्रक्रिया,पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया इ. मोफत करण्यात येणार आहे.बर्‍याच अशा शस्त्रक्रिया आहेत ज्या कुठल्याही योजनेत बसत नाहीत. त्या मोफत अथवा अत्यल्प दरात करवुन घेण्याचा आपला प्रयत्न असेल. एकुणच तालुक्यातील आरोग्य सेवेचा अनुशेष भरून कढण्याचा तालुका डॉक्टर्स असोसिएशन चा प्रामाणिक प्रयत्न राहील. डॉ. करणसिंह घुले

COMMENTS