रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील-  ऍड रविकाका बोरावके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील- ऍड रविकाका बोरावके

कोरोनाच्या संकटाने उग्र रूप धारण केले आहे. मे महिन्यामध्ये हि केवळ लाट न राहता 'सुनामी' होईल अशी टिपन्नी दिल्लीच्या आय.आय.टी ने केली असल्याची माहिती बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेत डंका : कुमावत
*तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ११ जून २०२१ l पहा LokNews24*

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोरोनाच्या संकटाने उग्र रूप धारण केले आहे. मे महिन्यामध्ये हि केवळ लाट न राहता ‘सुनामी’ होईल अशी टिपन्नी दिल्लीच्या आय.आय.टी ने केली असल्याची माहिती बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

   यात बोरावके यांनी पुढे म्हटलं आहे की, येणाऱ्या मे महिन्यातील ५ मे ते २५ मे हा कालावधी अतिशय धोकेदायक असणार आहे अशी भिती या संस्थेने व्यक्त केलेली आहे. अनेक सेवा भावी संस्था कोविड रूग्ण सेवा सुरू करू इच्छिताहेत, परतू प्रशिक्षित रूग्न सेवकांच्या अभावी कोविड सेंटर सुरू करायला अडचणी आहेत. जिल्ह्य परिषद मार्फत अशा सेवकांची भर्ती करून ग्रामीण रूग्णालयांच्या देखरेखी खाली जर हि सेवा पुरवता आली तर अनेक सेवा भावी संस्था जागा व पैसा उपलब्ध करून या कार्यास हातभार लावायला तयार आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ऑक्सीजनचा पुरवठा होऊ शकणार असेल तर अशा काही केंद्रावर सुध्दा गरजू पेशंटची सोय त्यांच्या गावाजवळ मिळल्यास त्यांचे प्राण वाचविता येतील. या कामी काही सेवाभावी डॉक्टर मंडळीही अशा सेंटरला मार्गदर्शन व सेवा कार्य करायला तयार आहेत. त्या त्या ठिकाणच्या छोटया छोटया संस्थाही औषधांसाठी व दैनदिन कामकाजासाठी आर्थिक मदत करायला तयार आहेत. जिल्हा परिषदेने ग्रामीण रुग्नालयाच्या अंतर्गत प्रशिक्षित रूग्ण सेवक व सेविकांची भरती करून दिल्यास गावोगावी सेवा कार्य होतील, असा विश्वास कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. रविकाका बोरावके यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS