Homeताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड : महाराष्ट्र विधानपरिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्या

मुदखेड-आदिलाबाद रेल्वेमार्गावरील अमृत भारत स्थानक विकासकामांची डीआरएम प्रदीप कामले यांच्याकडून पाहणी
राज्यातील कवी, शिक्षक, साहित्यिक, कलावंतांचा विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी
सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कर्मचार्‍यांचे असहकार आंदोलन; कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ
नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,  18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज, #नांदेड  , दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र ...

नांदेड : महाराष्ट्र विधानपरिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने गुरुवार, १८ जून २०२६ रोजी मतदान केंद्र परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील तहसील कार्यालय नांदेड, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या मतदान केंद्र परिसरात गुरुवार, १८ जून २०२६ रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहने, संबंधित पक्षाच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्याकरिता प्रतिबंधित करण्यात आले आहे.

हा आदेश, नांदेड विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा हद्दीपर्यंत मतदानाच्या दिवशी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरासाठी अमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत

COMMENTS