Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काशिनाथ खोसे पाटील यांचे निधन

निघोज ः पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन काशिनाथ महादेव खोसे पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर

बसस्थानकात एसटीच्या चालकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड
कोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन

निघोज ः पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन काशिनाथ महादेव खोसे पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय कडक व स्वच्छ राहणीमान आणि स्पष्ट वक्ते असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी मंजुळाबाई, तीन विवाहीत मुले, मोठा मुलगा व नगरच्या सुप्रसिद्ध शुभ हेल्थ केअर फर्मचे संचालक दिलीप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष सुरेश, महानगर बँकेतील कर्तव्य दक्ष कर्मचारी प्रकाश व मुंबई येथे असलेली विवाहीत मुलगी वैशाली, सून पत्रकार निलम यांचे सासरे होत. त्यांच्या पश्‍चात सुना, नातवंडे, जावई परिवार होत. त्यांच्या निधनाने पारनेर तालुक्यात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS