Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या उमेदवारांला मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोर

Oplus_0 पाथर्डी ः आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याच पक्षातील उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळावे यासाठी निवडणुकीतील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रव

दिव्यांग आणि महिला मतदार नोंदणीची विशेष मोहीम
संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा
Ahmednagar : नेहरू मार्केटला भीषण आग | Loknews24
Oplus_0

पाथर्डी ः आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याच पक्षातील उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळावे यासाठी निवडणुकीतील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थक भर उन्हात प्रचार करत शहरातील  प्रत्येक प्रभागात जावून दोघांचेही समर्थक शहर पिंजून काढत असल्याने या वेळी शहरातून कोणाला मताधिक्य मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
शहराची मतदारसंख्या जवळपास बावीस हजारच्या आसपास आहे. सध्या आपल्या उमेदवाराच्या पदरात अधिक मते पडावीत यासाठी विखे यांचे शहरातील कार्यकर्ते डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, बंडूशेठ बोरुडे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, बजरंग घोडके, महेश बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, रमेश गोरे, प्रतिक खेडकर, प्रसाद आव्हाड, प्रशांत शेळके यांनी शहराच्या अनेक भागात जाऊन विखे यांना मते देण्याचे आव्हान केले आहे तर लंके यांच्या साठी बंडुपाटील बोरुडे, नासिर शेख, किसन आव्हाड, हरिहर गर्जे, योगेश रासने, देवा पवार, भाऊसाहेब धस, बबलू वावरे, सोमनाथ बोरुडे, सचिन नागापुरे, आकाश काळोखे, जुनेद पठाण, भाऊ तुपे, राजेंद्र बोरुडे, अतिष निर्‍हाळी, सोमनाथ माने, अक्रम आतार ही मंडळी शहरासह पालिका हद्दीत असलेल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. या पूर्वीचा लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता लोकसभेच्या उमेदवारासाठी तालुक्याच्या प्रमुख नेत्यांसह एखादी फेरी शहरातून निघत असायची मात्र सध्या निवडणुकीतील चुरश वाढली असून एका एका मतालाही चांगलीच किंमत आल्याने दोन्हीही नेत्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. लंके यांचे समर्थक प्रचार फेरी चालू असताना लंके यांच्याशी थेट व्हिडीओ कॉल ने संवाद साधतात व लंके सुद्धा प्रत्येकाचे आभार मानत या कार्यर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत शहरात 19 हजार 365 मतदान होते त्या पैकी 11 हजार 635 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विखे यांना त्या वेळी 7 हजार 328 तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या संग्राम जगताप यांना 3 हजार 879 मतदान झाले होते. या वेळी मात्र दोघांच्याही समर्थकांनी आपल्याच उमेदवाराला मताधिक्य देण्याचा चंग बांधल्याने मताधिक्य नेमके कोणाला मिळणार या कडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS