Homeताज्या बातम्यामनोरंजन

कंगना रनौतचा ‘तेजस’ बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप

मुंबई - बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा लोकप्रिय चित्रपट तेजस 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली.

कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ त होणार मिलिंद सोमनची एन्ट्री
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील कंगनाचा लूक चर्चेत.
कंगना रणौतने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन

मुंबई – बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा लोकप्रिय चित्रपट तेजस 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. ‘तेजस’ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. पहिला वीकेंड ‘तेजस’साठी खूपच निराशाजनक राहिला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केवळ 1.30 कोटींची कमाई केली आहे. 60 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये 5 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही, ही कंगनासाठी चिंतेची बाब आहे. असेही बोलले जात आहे की येत्या सोमवारच्या टेस्टमध्ये हा चित्रपट नक्कीच नापास होईल. एकूणच या आकड्यांवर नजर टाकली तर चित्रपटाने सोमवारी 54 लाखांची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली. आकडेवारीवर नजर टाकली तर चित्रपटाने दोन दिवसांत केवळ 2.50 कोटींची कमाई केली आहे. आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत आणि ते पाहता कंगनाचा ‘तेजस’ पहिल्या तीन दिवसात 4 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.

COMMENTS