Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुखांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे दुसर्‍या दिवशीही छापे

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर शुक्रवारी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा सलग

अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका
तडजोडीस नकार दिल्यानंतर मला ईडीकडून अटक
अनिल देशमुखांची आज होणार सुटका


मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर शुक्रवारी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा सलग दुसर्‍या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांसोबत सीआरपीएफचे पथक सुद्धा उपस्थित आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकत तब्बल 16 तास कारवाई केली होती. गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. 25 मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला 24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवस्थानी छापेमारी केली केली त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती 17 सप्टेंबरला आता इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीयेत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.

COMMENTS