Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात आज सातबारा फेरफार अदालत अभियान

अकोले/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या महाराज स्व अभियानांतर्गत तालुक्यातील महसूल मंडळात शुक्रवार दिनांक 19 मे रोजी सातबारा फेरफार आदालत अभियान आ

घंटागाडी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…
गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटीवर

अकोले/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या महाराज स्व अभियानांतर्गत तालुक्यातील महसूल मंडळात शुक्रवार दिनांक 19 मे रोजी सातबारा फेरफार आदालत अभियान आयोजित करण्यात आले आहे. अकोले, विरगाव, समशेरपूर, साकीरवाडी, राजुर, शेंडी, कोतुळ व ब्राह्मणवाडा या या महसूल मंडळामध्ये 19 मे रोजी सातबारा व फेरफार नोंद आदालत होणार आहे. यात सातबारा अथवा फेरफार नोंदणी मध्ये कोणाच्या काही अडचणी असतील, त्यांनी कागदोपत्री पुरवण्याची त्या त्या मंडळात हजर राहून आपल्या अडचणी सोडून घ्याव्यात. या दिवशी प्रत्येक मंडळात समाविष्ट गावातील तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित राहून शक्य त्या अडचणी जागेवर सोडवतील. त्यांच्या अडचणी आहेत त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार अकोले सतीश थेटे, नायब तहसीलदार सुधीर उबाळे, ठकाजी महाले यांनी केले आहे.

COMMENTS