Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणार : खा.अजित गोपछडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लढ्याला अखेर यश

नांदेड : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र आणि माध्यमात काम करणार्‍या पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले अत्यंत गंभीर स्वरूपाचे झाले असून

टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला जोरदार धडक; कोल्हापूरच्या दोघांचा मृत्यू
भीषण अपघातानंतर बस पेटली  सात जणांचा होरपळून मृत्यू, धुळे महार्गावरील दुर्घटना
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
Ajit Gopchade : नांदेडच्या नेत्याला भाजपकडून राज्यसभेचा जॅकपॉट; कोण आहेत अजित  गोपछडे?


नांदेड : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र आणि माध्यमात काम करणार्‍या पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले अत्यंत गंभीर स्वरूपाचे झाले असून पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे खा.डॉ. अजित गोपछडे यांना कळवले आहे.  पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी   खा.डॉ. अजित गोपछडे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे पत्र पाठवले आहे.
भारतीय लोकशाहीमध्ये माध्यम स्वातंत्र्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षापासून देशात माध्यमांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे माध्यम आपली भूमिका ताठर आणि निर्भीडपणे मांडत आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले .अनेकांचे प्राण गेले तर अनेकांना धमक्या दिल्या गेल्या.  हे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम.देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी 40 वर्ष संघर्ष केला होता. 8 नोव्हेंबर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायदा पारित करण्यात आला. देशाच्या महामहीम राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली होती. मात्र दरम्यानच्या काळात राज्यात अन्य सरकार आल्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लक्ष वेधण्यात आले.  नांदेड येथील पत्रकार तथा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक राम तरटे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. शिवाय त्यांनी खा. डॉ. अजित गोपछडे यांची दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी भेट घेऊन  या प्रकरणाकडे लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधावे, राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती केली होती. शिवाय अन्य पत्रकार संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला होता.  राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी खा. डॉ. गोपछडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांना त्यांनी लेखी पत्र पाठवले होते. अनेक वेळा भेट घेऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करत असल्याचे लेखी पत्र खा. डॉ. अजित गोपछडे यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिली आहे. अध्यादेश लागू होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.

COMMENTS