Homeताज्या बातम्या

14 जून रोजी होणार्‍या 21 व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाची जोरदार तयारीबीजभाषण, प्रकट मुलाखत, कवीसंमेलन व पुरस्कार वितरणासह विविध कार्यक्रम

नांदेड : सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका कामगार-कर्मचारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनियनच्या रौप्य महोत्सवी वर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : क्रांतिकारी समाज परिवर्तक !
मानवमुक्तीचा विचारच जेता !
नवभारताचे शिल्पकार !


नांदेड : सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका कामगार-कर्मचारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनियनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन येत्या 14 जून रोजी नांदेड येथे होणार असून संमेलनाच्या तयारीला वेग आला असल्याची माहिती मुख्य संयोजक पँथर गणेश शिंगे, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, निमंत्रक जी. पी. मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष उन्मेश ढवळे यांनी दिली.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार्‍या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे भूषविणार आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संमेलनात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, अंजली आंबेडकर, खा. प्रा. रवींद्र चव्हाण, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, फारुक अहमद, ज्योती परांजपे, प्रा. दत्ता भगत, डॉ. प्रवीण पाटील, रवीचंद्र हडसनकर, प्रा. जगदीश कदम, विलास सिंदगीकर, बालाजी थोटवे, लक्ष्मण लिंगापूरे, अर्चना खोब्रागडे, विवेक मवाडे, आदिनाथ इंगोले आदी मान्यवर विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांची प्रकट मुलाखत हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीत आयोजित ‘काव्यपौर्णिमा’ कवीसंमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक लालबाजी घाटे, मुख्य समन्वयक अ‍ॅड. विजय गोणारकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर, सचिव श्रावण नरवाडे, राहुल गवारे, कार्याध्यक्ष मारोती कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. भीमरत्न पुरस्कार नामदेवराव व्हटकर यांना जाहीर डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशन, नांदेड व नांदेड-वाघाळा शहर मनपा कामगार-कर्मचारी युनियनतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘ग्रेट डिव्होटी अवॉर्ड’ तथा ‘भीमरत्न पुरस्कार’ दिवंगत नामदेवराव व्हटकर (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण करून त्यांनी इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन केला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे संमेलन समर्पित करण्यात आले असून त्यांचे चिरंजीव डॉ. जयवंतराव व्हटकर पुरस्कार स्वीकारणार आहेत.

COMMENTS