Homeताज्या बातम्या

शिंदेंसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही : ओमराजे निंबाळकर

धाराशिव : पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत पक्षांतराच्या चर्चांना तात्पुरता

पुण्यात मध्यरात्री पोलिसांचे रेव्ह पार्टीवर छापेशंभरहून अधिक युवक-युवती ताब्यात घेतल्याने खळबळ
महामार्गावरील फलकावर ‘डहाणू’ ऐवजी हिंदीत ‘दहानु’ लिहिल्याने पालघरमध्ये तरुणाने लोखंडी रॉडने फलक फोडला, व्हिडिओ व्हायरल!
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  


धाराशिव : पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत पक्षांतराच्या चर्चांना तात्पुरता विराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा कोणताही अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढील भूमिका निश्‍चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या चर्चेत असलेल्या खासदारांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कथित ‘वाघ मोहीमे’पुढे अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक आणि राजकीय भूमिकेतील फरक स्पष्ट करत पक्ष बदलण्याचे संकेत दिले होते. भावनिक दृष्टीने पक्ष सोडणे चुकीचे वाटू शकते, मात्र राजकीय गणितांच्या दृष्टीने तो निर्णय योग्य ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा अधिक वेगाने सुरू झाली होती. मात्र, पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर त्यांनी अधिक संयमित भूमिका घेतल्याचे दिसून आले. आपल्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, पवनराजे हत्याकांडाचा निकाल आणि पक्षांतराचा निर्णय यांचा कोणताही संबंध नाही. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात आपल्या वडिलांसह त्यांच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या निकालाला वैयक्तिकदृष्ट्या मोठे महत्त्व होते, असे त्यांनी सांगितले. आता मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतरच पुढील राजकीय दिशा निश्‍चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS