Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार नव्हे, आमदारच प्रशासनाच्या दारी

फाईल मंजूर होत नसल्याचे भाजप आमदार बागडेंचे आंदोलन

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ’सरकार आपल्या दारी’ मोहीम जोरदारपणे राज्यातील विविध भागात राबविण्यात येत आहे. मात्र

वडिलांनी मारहाण केल्याने १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर
सचिव भांगेंमुळे अनु. जाती- नवबौध्दाचे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून राहणार वंचित
Aurangabad : समृद्धी महामार्गाच्या कामाचे साहित्य चोरीला | LokNews24

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ’सरकार आपल्या दारी’ मोहीम जोरदारपणे राज्यातील विविध भागात राबविण्यात येत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपच्या आमदाराने सरकार नव्हे तर आमदारच प्रशासनाची दारी येवून आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची चर्चा राज्यभर रंगताना दिसून येत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात वर्षभरापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल 700 फाइल धूळखात पडून आहेत. अधिकार्‍यांकडून या फाइल मंजूर करण्यातच आल्या नसल्याने त्या पडून होत्या. त्यामुळे जोपर्यंत या फाइल मंजूर केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत माजी विधानसभा अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी घेतला होता. बागडे यांनी थेट पंचायत समितीमध्येच आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे शनिवारी 24 जूनला आयोजित ’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करायचे होते. मात्र अधिकारी फाईलवर सही करत नसल्याने हे सर्व प्रकरण प्रलंबित पडले. त्यामुळे संतापलेल्या बांगडेंनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले आणि आंदोलनाला सुरुवात केली. सरकारकडून ’प्रशासन आपल्या दारी’ ही योजना राबवली जात आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील लोकांचे काम मंजूर होत नसल्याने आणि त्यांच्या फाईल शासकीय कार्यालयात धुळखात पडून असल्याने आमदार बागडे यांनी ’आमदार प्रशासनाच्या दारी’ आंदोलन केले. यावेळी त्यांनी तब्बल 8 तास पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकार्‍यांच्या खुर्चीसमोर ठिय्या आंदोलन केले. तर जेवण देखील तिथेच केले. शेवटी जिल्हा परिषद सीईओ यांनी उद्या सर्व फाइल मार्गी लागतील असे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच आंदोलन मागे न घेतल्यास मी स्वतः भेटण्यासाठी येतो असे सांगितल्यावर बागडे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. पंचायत समितीमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी विहिरीच्या फायली पूर्ण करण्यासाठी 8 तास ठिय्या आंदोलन केले होते. आमदार बागडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रात्री 12 ते 1 पर्यंत 150 फायली पूर्ण झाल्या होत्या. तसेच शुक्रवारी दिवसभरात अनेक फायली पूर्ण झाल्या आहे. अशाप्रकारे एकूण 465 फायली पूर्ण झाल्या. सध्या गटविकास अधिकारी नसल्याने यावर स्वाक्षर्‍या बाकी आहे. तर येथील गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची रात्रीतूनच बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर संजय गायकवाड हे बीडीओ म्हणून रुजू झाले. ते या सर्व विहिरीच्या कार्यरंभ आदेशावर स्वाक्षर्‍या करणार आहेत.

COMMENTS