Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईश्‍वरपूरच्या मोहिते दाम्पत्याची फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट मानली जाणारी युरोपातील फिनलंडची शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथील मुक्तांगण प

महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील
ना. रामराजे यांनी पदाचा वापर फलटणच्या जनतेसाठी करावा : अनुप शहा
कार्तिक स्वामी मंदिर शुक्रवारी दर्शनासाठी खुले : गोरखनाथ गुरव

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट मानली जाणारी युरोपातील फिनलंडची शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे संस्थापक व बालशिक्षणाचे अभ्यासक विनोद व वर्षाराणी मोहिते या दाम्पत्याची निवड झाली आहे.
फिनलंडमध्ये कार्यरत असणार्‍या क्रिएटिव्ह अ‍ॅण्ड कंटेम्पररी एज्युकेशन या संस्थेतर्फे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. भारतासह जगभरातील शिक्षणतज्ञ सहभागी असतील. 11 ते 15 मे दरम्यान हेलसिंकी-फिनलंडमध्ये होणार्‍या पहिल्या आतंरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषदेत मुक्तांगणचे उपक्रम जागतिक व्यासपीठावर सादर होतील. फिनलंड देश गेली अनेक वर्षं आनंदी देश म्हणून जगभरात सर्वोच्च स्थानावर आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, इथली शिक्षण पध्दती आहे. ही सर्वोत्तम शिक्षण पध्दती जाणून घेताना फिनलंडमधील शाळा, तेथील शिक्षण पध्दती, शिक्षक-विद्यार्थी संवाद, मूल्याधिष्ठित शिक्षण व सृजनशील उपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
परिषदेदरम्यान सहभागी शिक्षकांना फिनलंडमधील सरकारच्या नियंत्रणात असणार्‍या शाळांना भेटी देण्याची, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तसेच विविध शैक्षणिक कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेत संशोधनावर विशेष भर देण्यात आला आहे. फिनलंड स्थित शिक्षणतज्ञ शिरीन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे नियोजन सुरू आहे.

COMMENTS