Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी- भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव सबंध भारतभर मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो त्यात अनुषंगाने गुरुवार 30 मार्च रोजी असलेल्या प्रभ

अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा l पहा LokNews24
देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण

कोपरगाव प्रतिनिधी- भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव सबंध भारतभर मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो त्यात अनुषंगाने गुरुवार 30 मार्च रोजी असलेल्या प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या वतीने कोपरगाव येथील साई सिटी क्रिकेट मैदानात विविध उपक्रमाने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.श्रीराम नवमी महोत्सव आयोजक कमिटीच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य कृष्णकृपा मूर्ती श्री श्रीमद ए सी भक्ती वेदांत स्वामी प्रभूपाद यांच्या कृपाशीर्वादाने कोपरगाव येथे श्रीराम नवमी निमित्त गुरुवार दि 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सुंदर चैतन्य प्रभू, अध्यक्ष इस्कॉन युथ फोरम, इस्कॉन जुहू मुंबई यांच्या वाणीतील हरिनाम  संकीर्तन, साडेसहा वाजता श्रीराम कथा, 8 वाजता सीताराम अभिषेक, साडेआठ वाजता मुंबई येथील प्रसिद्ध नाटिका कलाकार यांच्यातर्फे राम भरत भेट नाटिका सादरीकरण होणार असून त्यानंतर उपस्थितीत सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली असून तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी श्रीराम नवमी महामहोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS