Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकलेले 6 कोटी रुपये त्वरित द्या

स्नेहलता कोल्हे यांची ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील काकडी या गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत काकडी ग्रामपंचायतला कर स्वरूपात मि

प्रीतिसुधाजी स्कूलचा संस्कार फेस्टीवल ठरतोय आदर्श
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता
2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील काकडी या गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत काकडी ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी हक्काची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. विमानतळ प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतचे सुमारे 6 कोटी 16 लाख 29 हजार 776 रुपये थकले आहेत. ही थकीत रक्कम ग्रामपंचायतला त्वरित देण्यात यावी आणि गावातील विविध विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
  ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन शिर्डी दौर्‍यावर आले होते. ना. गिरीश महाजन यांचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. काकडी गावातील विविध प्रश्‍नांबाबत तसेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतची कराची थकलेली रक्कम तातडीने देण्यासंदर्भात स्नेहलता कोल्हे यांनी ना. गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी काकडीच्या सरपंच पूर्वा गुंजाळ, कानिफ गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, विजय डांगे, राजेंद्र भालेराव, बाबासाहेब सोनवणे, सतीश डांगे, विजय मच्छिंद्र डांगे, दत्तात्रय गुंजाळ, संजय सोनवणे, चंद्रकांत डांगे, संपत डांगे, भीमराज गुंजाळ, इंद्रभान गुंजाळ, ग्रामसेवक कार्ले यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांच्या सोयीसाठी सन 2017 मध्ये कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. या विमानतळासाठी 2006 साली भूसंपादन सुरू झाल्यानंतर काकडी ग्रामस्थांनी अत्यल्प मोबदल्यात 1500 एकर जमीन दिली. यावेळी स्थानिकांना नोकरीसह गावातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. मात्र, पंधरा वर्षे उलटूनही ही आश्‍वासने पूर्ण झाली नाहीत. काकडी गावात अजूनही शाळा नाही. रस्ते नाहीत. पथदिवे नाहीत. त्यातच विमानतळ प्राधिकरणाकडे काकडी ग्रामपंचायतचा कर मोठ्या प्रमाणात थकला आहे. 2017 मध्ये काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानसेवा सुरू केल्यापासून मागील सहा वर्षांत काकडी ग्रामपंचायतला मालमत्ता व इतर विविध कराच्या स्वरूपात मिळणारी हक्काची रक्कम अदा केलेली नाही. ही थकीत रक्कम वाढत जाऊन आजघडीला सुमारे 6 कोटी 16 लाख रुपये इतकी रक्कम विमानतळ प्राधिकरणाकडे थकली असल्याचे कोल्हे यांनी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.  

COMMENTS