Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भालगावमध्ये मूर्तीप्राणप्रतिष्ठा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री समर्थ सदगुरु किसनगीरी बाबा व ब्रम्हलीन प. पु. 1008

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री समर्थ सदगुरु किसनगीरी बाबा व ब्रम्हलीन प. पु. 1008 बालब्रम्हचारी महाराज यांच्या आशिर्वादाने तसेच शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प. भास्कररगिरी महाराज यांच्या प्रेरणेने बुधवार 10 मे पासून ते शुक्रवार 12 मे पर्यंत या कालावधित करण्यात येणार असून श्री विठ्ठल रुख्मिनी, श्री गणेश, हनुमंत, महादेव पिंड व नंदी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळ्याच्या निमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी 18 वा अध्याय पारायण व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संत संगती, ग्रंथ वाचन, ईश्‍वर सेवा यामुळे अंतःकरण पवित्र होते, सदगुणांची वाढ होवुन परमार्थात मानव मात्रांची प्रिती वाढुन वारकरी संप्रदायाचे सात्वीक विचार, त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्येशाने या कार्यंक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सप्ताह कमिटीकडुन सांगण्यात आले आहे. सप्ताह काळात ह.भ.प. महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख तर काल्याचे किर्तन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या सुस्राव्य अमृत वानितुन होनार आहे. या काळात ह.भ.प. कैलासगिरी महाराज, ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक, ह.भ.प. सुनिलगिरी महाराज, ह.भ.प. गोपालगिरी महाराज, ह.भ.प. भगवान महाराज जंगले, ह.भ.प. रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, ह.भ.प. लक्ष्मन महाराज नांगरे, ह.भ.प. विजय महाराज पवार, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार हे महाराज सदिच्छा भेट देणार आहे. सप्ताहाच्या प्रथम दिवशी मिरवणूक, गणपती पूजन, पुण्य वाचन, मातृका पूजन, वस्रोधरा, नांदी श्राध्द, ब्राह्मण पुजन, पंचकाव्य, कुंडपूजन, स्थापित देवता पूजन, जलनिवास, सायंमपुजन, आरती तर द्वितीय दिवशी प्रातपुजन, अग्निपूजन, अग्निस्थापन, नवग्रहपूजन, वृद्रपिठपूजन, अवन, स्नपनविधी, न्यास, कुटिर होम, शांतीपूष्टीक होम, धान्यनिवास, शैय्यानिवास, सायंमपूजन, आरती तर तृतिय दिवशी प्रातःपूजन, उत्तरांगण, हवन, उत्तरपूजन, सृष्टीकृत होम, नवआहुती, बलिदान व सकाळी 8:30 वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते मुर्तीप्राणप्रतिष्ठा, कळसारोहण, पूर्णाहुती, अभिषेक, विसर्गनाम, आरती, आशिर्वाद या प्रकारे मुर्तिप्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची रुपरेषा असल्याचे कमिटीकडून सांगण्यात आले आहे.
उस्थळखालसा, बहिरवाडी, गोधेगाव, धामोरी या गावाच्या भजणी मंडळाचे जागर होनार असुन ज्ञानेश्‍वरी पारायनाचे व्यासपीठ ह.भ.प. गणेश महाराज तनपुरे, काकडा भालगाव, उस्थळ भजनी मंडळ, मृदुंगाचार्य भास्कर महाराज तारडे व दादा महाराज साबळे, गायक पंढरीनाथ मिस्तरी, ज्ञानेश्‍वर माऊली, रामकिसन पटारे, राम पटारे, संदिप पटारे, तुकाराम बोस्टे, बाळासाहेब महाराज पवार तर विनेकरी ह.भ.प. आबासाहेब तनपुरे यांच्याकडे असणार आहे. महाप्रसादाचे आचारी दत्तात्रय बर्डे व बाळासाहेब जाधव, साऊंड सिस्टीम महेश गायकवाड तर चहापाणी अकबर शेख यांचा असणार आहे. या काळात सकाळी नाष्टा, दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पंचक्रोषीतील भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थीत राहण्याची विनंती सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS