Homeताज्या बातम्याविदेश

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरले

कोलंबो प्रतिनिधी - भारतीय टीम आणि भारतीय चाहते सध्या आशिया कप जिंकल्याचा आनंद साजरा करत आहेत. अशातच भारतीय टीमचे काही खेळाडू रविवारी सामना सं

रोहित शर्माला भासतेय बुमराहची कमी ? 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर वाहतूक पोलिसांची कारवाई
रोहित शर्माने लुटला होळीचा आनंद

कोलंबो प्रतिनिधी – भारतीय टीम आणि भारतीय चाहते सध्या आशिया कप जिंकल्याचा आनंद साजरा करत आहेत. अशातच भारतीय टीमचे काही खेळाडू रविवारी सामना संपल्यानंतर भारतात परतले. पण या वेळी कॅप्टन रोहित शर्मा त्याचा पासपोर्ट विसरला. खरं तर तो केव्हा काय विसरेल सांगता येत नाही. विराट कोहलीने काही वर्षांपूर्वी रोहितच्या विसरण्याच्या सवयीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. रोहित काहीही विसरू शकतो, असं त्यावेळी विराट म्हणाला होता. याचीच प्रचिती रविवारी आली. या वर्षी जानेवारी महिन्यात रोहित शर्मा टॉसनंतर टीमला आधी बॅटिंग करायची आहे की बॉलिंग करायची आहे हेही विसरला होता. त्या वेळी काही सेकंद विचार केल्यानंतर त्याने त्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आशिया कप जिंकल्यानंतर त्याचं हेच रूप पाहायला मिळालं.

रोहित त्याचा पासपोर्ट विसरला : मुंबईचे खेळाडू काल रात्रीच कोलंबोहून निघाले. कॅप्टन रोहित शर्मा सर्वात शेवटी बसजवळ पोहोचला. तेव्हा त्याला आपण पासपोर्ट विसरल्याचं आठवलं. ही बाब इतर खेळाडूंना कळताच त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अशा स्थितीत रोहित शर्मा क्लूलेस दिसत होता. त्यानंतर टीमच्या सपोर्ट स्टाफ मेंबरने त्याला त्याचा पासपोर्ट आणून दिला. यानंतर बस पुढे निघाली. रोहितने दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. 2018 मध्ये, विराट कोहली टीमचा कॅप्टन होता, परंतु तो आशिया कप खेळण्यासाठी गेला नव्हता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ यूएईमध्ये आशिया कप खेळला. भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता टीमने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून आशिया कप जिंकला आहे.

COMMENTS