Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सुभेदार’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच त्याच्या शिवराज अष्टकमधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांवर पाणी मारा
Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)
सकल मराठा समाजाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक

लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच त्याच्या शिवराज अष्टकमधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुभेदार चित्रपटात तानाजी सुभेदारांनी केलेली तलवारबाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी यांच्यातील मैत्री, कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी केलेली लढाई यांची झलक पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या चित्रपटात तानाजी सुभेदारांच्या घरी लेकाच्या लग्नाची सुरु असलेली लगबग, त्याचवेळी स्वराज्यावरील संकट आणि बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेऊन गड जिंकण्यासाठी निघालेले सुभेदारही पाहायला मिळत आहेत. “म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यांसनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजं हवं ना”, असा डोळ्यात अश्रू आणणारा एक डायलॉगही पाहायला मिळत आहे.  ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ अशा अनेक सुपरहिट सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर आता सुभेदार या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे शिवरायांचे शूरवीर मावळे तान्हाजी मालुसरेच्या पराक्रमावर आधारित आहे. हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर मृणाल कुलकर्णी जिजाऊ साहेबांची भूमिका साकारणार आहे.

COMMENTS