Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार्या नोकर भरती प्रक्रियेतील शुल्क तात्काळ कमी करा

अंबाजोगाईत उपजिल्हाधीकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह आक्रोश मोर्चा

अंबाजोगाई प्रतिनिधी - महाराष्ट्र  शासनाच्या वतीने अनेक पदासाठी नोकर भरती प्रक्रिया चालु आहेत  या नोकर भरती प्रक्रीसाठी सेवाशुल्क आकारणी करतांना

‘सिंघम अगेन’ च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
मुंबई – महाराष्ट्राचे आर्थिक शोषक !
अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल- विनायक नरवडे

अंबाजोगाई प्रतिनिधी – महाराष्ट्र  शासनाच्या वतीने अनेक पदासाठी नोकर भरती प्रक्रिया चालु आहेत  या नोकर भरती प्रक्रीसाठी सेवाशुल्क आकारणी करतांना खुल्या वर्गासाठी 1000 रु. व राखीव वर्गासाठी 900 रु. शुल्क आकारल्या जात आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना व पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे हा शुल्क कमी करुन सरसकट 200 रु. आकारण्यात यावा तसेच ढउड कंपनी व्दारे उे-ेशिीरींर्ळींश जषषळलशी ग्रेड 1 व 2 या दोन्ही पदासाठी प्रत्येकी 900 रु. शुल्क म्हणजे दोन्ही पदासाठी 1800 रु. शुल्क आकारण्यात आला  त्यानुसार दोन्ही परीक्षा स्वतंत्र घेयला पाहीजे होत्या परंतु दोन्ही पदाची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी एकाच परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत मग वेगवेगळा शुल्क का आकारण्यात आला एक शुल्क परत देण्यात यावा या सारख्या सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई च्या वतीने अंबाजोगाई येथील बसस्टॅन्ड ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून निवेदन देण्यात आले, या मोर्चात अंबाजोगाई येथील महाविद्यालईन विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व शासनाच्या विरोधात तिव्र भावणा व्यक्त केल्या या प्रसंगी केज विधान सभेचे मा.आ.पृथ्वीराज साठे,राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल चे प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश चामणर,तानाजी लांडगे,बालाजी शेरेकर,कल्याण भिसे,हामीद चौधरी,रणजित मोरे,अशोक हेडे,बाबा भिसे,तसेच विद्यार्थ्यांमध्ये दिपक गायकवाड,अथर्व तांबरे,अक्षय राऊत,महेश पुरी,ऋषिकेश वैद्य,कु.वैष्णवी  शिंदे,कु.नंदीनी उबाळे,कु.रिध्दी पडुळे,मोनिका वाकसे,आईशा चाऊस,रबिया युसुफ,केंद्र सुदाम,मुळे बळीराम,मस्के मुकेश व ईतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित.

COMMENTS