Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. हरी नरके यांच्या रूपाने  राष्ट्राने जेष्ठ परिवर्तनवादी साहित्यीक , लेखक व थोर विचारवंत गमावला:- राजकिशोर मोदी

अंबाजोगाई प्रतिनिधी - महाराष्ट्राने प्रा. हरी नरके यांच्या रूपाने एक परिवर्तनवादी साहित्यिक, लेखक व थोर विचारवंत तथा ओबीसी समाजाचे नेता गमावला अस

महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने 500 कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडत 5 कोटी रुपयांचा मिळवला करपूर्व नफा
कोरोना संकट काळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी शासनाचे व्यापक प्रयत्न : राज्यपाल

अंबाजोगाई प्रतिनिधी – महाराष्ट्राने प्रा. हरी नरके यांच्या रूपाने एक परिवर्तनवादी साहित्यिक, लेखक व थोर विचारवंत तथा ओबीसी समाजाचे नेता गमावला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पणन महासंघाचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. प्रा. हरी नरके यांनी  महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सखोल असे  लेखन केले आहे. त्यांचं नुकतेच मुंबई येथे निधन झाले. मृत्यू समयी  ते 60 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.    
प्रा. हरी नरके यांचा ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.  तसेच त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय असे कार्य केले आहे.  पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं विशेष राहिलं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यां भाषांवर देखील त्यांचे प्रभुत्व होते. मराठी ही अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांचे मोलाचे योगदान आहे.  महाराष्ट्र शासनाने ’समग्र महात्मा फुले’ नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला. त्या ग्रंथाचे प्रा. हरी नरके हे संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र  वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन प्रा हरी नरके यांनी केले होते. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने राज्यातील ओबीसी समाजा बरोबरच राज्यातील साहित्य , लेखन व परिवर्तन आणि पुरोगामी चळवळ पोरकी झाल्याचे याप्रसंगी राजकिशोर मोदी म्हणाले. या जेष्ठ  विचारवंताला व ओबीसी नेत्याला अंबाजोगाई शहर व राजकिशोर मोदी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

COMMENTS