Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सागरेश्‍वरच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन

कडेगांव / प्रतिनिधी : सागरेश्‍वर वन्यजीव अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यापासून काही दिवसांच्या अंतराने अभयारण्याबाहेर बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे अ

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
चांदोली अभयारण्यात वणवा; आग विझविण्याचे वन्यजीव यंत्रणेचे केविलवाणा प्रयत्न; वनव्याचे सत्र सुरू; महिन्याभरातील दुसरी घटना
कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कडेगांव / प्रतिनिधी : सागरेश्‍वर वन्यजीव अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यापासून काही दिवसांच्या अंतराने अभयारण्याबाहेर बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे अभयारण्या शेजारील शेतकर्‍यामध्ये कमालीची भीती दिसून येत आहे. सागरेश्‍वरच्या अभयआरण्यात हरीण, काळवीटांचे आहेत. तसेच त्यांच्या संवर्धनाचा प्रकल्प या परिसरात बनविण्यात आला आहे.
शनिवारी रात्री सागरेश्‍वरच्या घाटात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. देवराष्ट्रे-ताकारी रस्त्यावर सागरेश्‍वर मंदिराच्या जवळच भर रस्त्यात बिबट्या चारचाकी गाडीसमोर आल्याचे पाहावयास मिळाले आहे. गाडीसमोरून शांतपणे चालत बिबट्या अभयारण्याकडील बाजूस गेल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रशांत जमदाडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, देवराष्ट्रे येथील प्रशांत जमदाडे शनिवारी रात्री देवराष्ट्रेकडे येत असताना सागरेश्‍वर मंदिराच्या नजीक बिबट्या त्यांच्या चारचाकी गाडीला आडवा गेला. बिबट्या शांतपणे चालत अभयारण्याच्या दिशेने निघाला होता. केवळ 40 ते 50 फुटांच्या अंतरावरून बिबट्या शांतपणे चालत अभयारण्याच्या कुंपणाच्या दिशेने गेला. सागरेश्‍वर अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यापासून तो अनेकदा अभयारण्याच्या बाहेर दिसून आला. अभयारण्याच्या पश्‍चिम बाजूकडील कुंपनाशेजारी वानरांचा पाठलाग करताना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला. सागरेश्‍वरच्या घाटात बिबट्या दिसण्याच्या घटना अनेकदा घडल्या. त्यामुळे अभयारण्याच्या कुंपणाशेजारील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS