Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचे बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी ः गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळाचे सावट यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, गेल्यावर्षी सरकारने अतिवृष्टीची जाहीर केले

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत
स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद

अहमदनगर/प्रतिनिधी ः गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळाचे सावट यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, गेल्यावर्षी सरकारने अतिवृष्टीची जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्यापही वितरीत न केेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, याप्रकरणी नेवासे तहसील कार्यालयात शेतकर्‍यांनी अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन केले.
अतिवृष्टीचे नुकसानीचे पिकाची भरपाई मंजूर होऊनही यादीमध्ये नावे येऊन ही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित जमा करावी, या मागणीसाठी प्रशासनाच्या विरोधात ’जीवन ज्योत फाउंडेशन’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे व तहसील यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी अतिवृष्टीने नेवासे तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांचे कपाशी, तूर, बाजरी, मका व फळबागांसह विविध पिकांचे नुकसान झाले होते. सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते. मागील वर्षीची पिकांच्या नुकसानीची भरपाई आली नाही, तर येत्या आठ दिवसात भेंडा या ठिकाणी चक्काजाम व नग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, मागील वर्षी अतिवृष्टीमध्ये नेवासे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे ही महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी अनेक गावात अतिवृष्टीचे नुकसान भरपाई प्राप्तही झाली आहे. शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी केवायसी पूर्ण केली आहे. परंतु अनेक शेतकर्‍यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी कमलेश नवले, छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, प्रदीप आरगडे, अक्षय बोधक, राहुल कांगुणे, प्रकाश मुळक, संजय ठुबे, अप्पासाहेब आरगडे, अभिजित बोधक, राम आरगडे, संजय उरे, राजू गायकवाड, सागर नवथर, नीलेश शिंदे, आम आदमी पार्टीचे संदीप आलावणे, करीम सय्यद, कृष्णा आरगडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS