Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली

उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला

मुंबई ः राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू असून, एकमेकांवर टीकास्त्र डागणे देखील सुरू असत

शेतकर्‍यांवर बंदूक रोखणारे सरकार खाली खेचणार
शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य

मुंबई ः राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू असून, एकमेकांवर टीकास्त्र डागणे देखील सुरू असतांना, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकीय स्थिती पाहता हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली आहे. तिला उंबरठ्यावरच रोखण्याची गरज आहे. त्यामुळे आता चूक केली तर देशात देशात हुकूमशाही येईल असा हल्लाबोल सोमवारी केला आहे. कुर्ला येथील मिल मैदानातील जैन धर्म गुरूंच्या प्रवचनाला हजेरी लावल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण देश सध्या कठीण वेळेतून जात आहे. देशाला कोण वाचवणार? जर यावेळी आपण पुन्हा एकदा चूक केली तर देशात हुकूमाशाही येणार. जर देशात हुकूमशाही आली तर देशातील सद्भावना, नीतिमत्ता संपून जाणार, असे ठाकरे म्हणाले. तसेच ज्या प्रकारे आताच काही वेळापूर्वी जैन धर्मगुरूंनी सांगितले की, सदभावना हवी, नीतिमत्ता हवी याचबरोबर आपल्या देशाला आता स्वातंत्र्याची गरज आहे. देशाने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि ती जिंकली. मात्र आज देशात तेच स्वातंत्र्य टिकवण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे उद्धव यावेळी म्हणाले. सध्या देश संभ्रमावस्थेत आहे. पुढे काय कारवे? असे अनेक प्रश्‍न लोकांसमोर आहेत. मी आज राजकीय बोलणार नाही, परंतु देशात आज अनेक परीक्षा रखडल्या आहेत. त्यावर बोलण्याची गरज आहे. तेव्हा सतर्क राहून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे तर सध्या हुकूमशाही ही आपल्या दरवाज्यावर येऊन ठेपली आहे. तिला तेथेच उंबरठ्यावर थांबविण्याची गरज असल्याचे मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

COMMENTS