Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळपेवाडीत साकारणार अद्यावत कॉम्पलेक्स व बसस्थानक

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील पश्‍चिम भागामधील कोळपेवाडी गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असून येथे रविवारी सात एकराच्या पुढील परिसरात भरणार्‍या आठवड

शेततळ्यात बुडून बापलेकासह भाच्याचा मृत्यू l पहा LokNews24
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश,रखडलेल्या कामाला सुरुवात
महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे – अ‍ॅड. देशमुख

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील पश्‍चिम भागामधील कोळपेवाडी गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असून येथे रविवारी सात एकराच्या पुढील परिसरात भरणार्‍या आठवडे बाजाराची सर्वदूर ख्याती असतांना कोळपेवाडीच्या नावाने येणार्‍या सर्व बसेस जागेअभावी सुरेगाव बस स्थानकावरुन ये जा करुन मुक्कामी राहतात ग्रामस्थांनी हि अडचण व गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत मालकीचे असणारे सर्व गाळे पाडुन या ठिकाणी असणार्‍या जागेवर अद्ययावत शाँपींग काँप्लेक्स सह बसस्थानक बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असुन लवकरच या विषयावर ग्रामसभेचे आयोजन होणार आहे.
कोळपेवाडी च्या माळरानावर कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकारी साखर कारखाना उभारत हजारो बेरोजगार हातांना काम देत शेतीला हक्काचे पाटपाणी मिळवल्याने हा परिसर हिरवागार आहे. कोळपेवाडीचा नामोल्लेख महाराष्ट्र भर होवुन बारमाही हाताला रोजगार मिळुन हा परिसर उद्योग व्यवसायामुळे भरभराटीस येवुन कोळपेवाडी बाजारपेठ नावारूपास आली गावच्या नावाने येणार्‍या सर्व बसेस ह्या जागेअभावी गैरसोयीच्या सुरेगाव बसस्थानका मध्ये थांबत असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत असल्याचे शल्य ग्रामस्थांना होते हि अडचण ओळखुन बाजार तळामध्ये ग्रामपंचायत कार्यालया शेजारी असणार्‍या स्वमालकिचे सर्व गाळे पाडुन एल आकारामध्ये दुमजली शाँपींग काँप्लेक्स उभारुन तळ मजल्यात सर्व सुविधा युक्त बसस्थानक ग्रामपंचायत बांधणार असुन गाळे धारकाकडुन जमा होणारे डिपॉझिट व जिल्हा परिषद यांचे कडुन कर्ज काढून सदर ईमारतीचे बांधकाम होणार आहे विस्तापित होणार्‍या सर्व व्यवसायिकांना प्राधान्य क्रमाने हक्काचे गाळे ग्रामपंचायत उपलब्ध करुन देणार आहे गावामध्ये सर्वदुर पल्याच्या बस गाड्या आल्यानंतर येथील व्यवसाय वाढुन गावचे नाव सर्वदुर पोहचेल पंचक्रोशीचे जागृत आराध्य दैवत महेश्‍वर मंदिराचा समावेश लवकरच क वर्गात समावेश होणार असल्याने धार्मिक पर्यटन विकास होणार आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ विस्तार बघता अद्ययावत बसस्थानक व शाँपींग काँम्लेक्स गावाला गतवैभव प्राप्त करुन देईल यात तिळमात्र शंका नाही.

COMMENTS