Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात अभिवादन

कार्याला उजाळा ; युवक मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

नाशिक प्रतिनिधी -स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्तपंचवटीतील नवीन आडगाव नाका, स्वामी नारायण नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरक

औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार
भेंडवळच्या भविष्यावरून अंनिसचे खुले आव्हान;श्याम मानव यांनी जाहीर केले 80 लाखांचे बक्षीस
अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबर मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ  

नाशिक प्रतिनिधी -स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्तपंचवटीतील नवीन आडगाव नाका, स्वामी नारायण नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.  युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही  कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी भाजपा महानगर सरचिटणीस सुनील केदार, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी  केदार,  भवर तसेच आयोजक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. सावरकर यांची राष्ट्रभक्ती आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी मार्गस्थ होणे, हेच खरे अभिवादन ठरेल , असे सांगितले. महेश कापडे यांनी आभार मानले.कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सुधाकर बडगूजर, विष्णु महाजन, महेश महंकाळे, सागर भगत, युवराज झोमान,  विशाल पवार, भालचंद्र कुर्जेकर,अधिकारी साहेब,सुनील वाघ, टी पी किरांगे,शंतनु शिंदे,दिलीप बडगुजर,दामोदर शेलार,आरिफ काझी,प्रवीण बोरस्ते,किशोर कुमावत,शुभम देवगिरे,आदी सह नागरिक उपस्थित होते.

COMMENTS