Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी परतीचे दोर स्वत कापले- वसंत मोरे

पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर

पुण्यातून वसंत मोरे लढणार लोकसभा
चंद्रा गाण्यावर वसंत मोरे यांनी धरला ठेका
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. वसंत मोरे माध्यमांसमोर गऱ्हाणे मांडू लागले. पुणे शहरातील पक्षातील नेत्यांच्या वागणुकीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे पक्षाच्या वरिष्ठांकडे सु्द्धा याबाबत तक्रार करुनही आपली दखल घेतली गेली नाही, याचं शल्य आपल्या मनात टोचत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. वसंत मोरे यांचा चेहरा यावेळी अनेक प्रश्नांचं उत्तर देताना दिसला. पुण्यातला मनसेचा वाघ अशी ख्याती असलेला नेता आज भावूक झालेला बघायला मिळाला. या नेत्याने आज मनसेला सोडचिठ्ठी दिलीय.

मी सरुवातीच्या काळात शिवसेनेत राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं. पुणे शहरातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता ज्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्या त्यावेळी मी सुद्धा विधानसभा मतदारसंघाचा उपविभाग अध्यक्ष होतो. त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा दिला. मी माझं स्वत:चं राजकीय करिअर राज ठाकरे यांच्यासोबत आहे. मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. कारण गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून मी पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. माझ्यावर वारंवार, माझ्या शहरातीलच काही पदाधिकारी, जे स्वत: इच्छुक नव्हते, पण निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या त्यावेळेस इच्छुकांची यादी वाढत गेली”, असं वसंत मोरे म्हणाले.  ज्या शहरांमध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली, पण हेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकीट मिळायला नको, पक्ष संघटनेने निवडणूक लढवायला नको असे निगेटीव्ह अहवाल राज ठाकरे यांच्यापर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं अशा लोकांपर्यंत काम करणं मला जमणार नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले आहेत”, असं वसंत मोरे म्हणाले

COMMENTS