Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी

टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राबवला उपक्रम कोपरगाव : सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांच

 शहरटाकळी येथे बंद व रास्ता रोको
संजीवनीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र  संघात निवड
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी

टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राबवला उपक्रम

कोपरगाव : सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे. अशातच कोपरगाव तालुक्यातील वारी येथील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यात सामाजिक जाणीवेतुन वारीतील सामाजिक संस्था राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ, भरतवाडी यांच्या सौजन्याने टँकरद्वारे शनिवारी (दि.13) पाच हजार लिटर पाणी मोफत पाणवठ्यात सोडण्यात आले. मात्र; एप्रिल महिना सुरू होऊनही या पाणवठ्याकडे वन विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. दरम्यान उष्णतेची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक गावात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यात पाणी टाकावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके यांनी केले आहे
यावेळी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, गोदावरी बायोरीफायनरीजचे सेवानिवृत्त अधिकारी मदन काबरा, पत्रकार तथा ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी शांताराम गोरे, विजय जाधव, राजेंद्र मुरार, गणेश भाटी, वारीचे पोस्टमास्तर संजय कवाडे, योगेश शिंदे, स्वप्निल टेके, सोनू चंदनशिव, भैय्या रोकडे यांच्यासह वन्यप्रेमी उपस्थित होते.

पाणवठ्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष !
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे गोदावरी नदीकाठी असलेल्या वनविभागाच्या जमिनीमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणवठा बांधण्यात आलेला आहे. परंतु, पाणवठ्यात काटेरी झुडपा व मातीने भरलेला होता. त्यावर स्थानिक मजूर व ट्रस्टचे स्वयंसेवक यांनी संपूर्ण पाणवठा स्वच्छ करून त्यात पाणी सोडले. सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष वाढलेले असताना मात्र; वन्य प्राण्यांप्रती वनविभागाचे उदासीनता व दुर्लक्ष झाल्याची खंत वन्यप्रेमींनी व्यक्त केली.

COMMENTS