Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रील बनवणार्‍या मुलीचा अपघातात मृत्यू

गाझियाबाद : रील बनवणे एका तरूणीच्या जीवावर बेतले आहे. गाझियाबादमध्ये रील बनवताना बाईकवर स्टंट करत असलेल्या एका तरुणीचा डिव्हायडरला धडकून मृत्यू झ

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये क्रेनची बकेट निसटून १६००°C तापमानाचे वितळलेले लोह अंगावर पडल्याने ८ कामगारांचा जागीच मृत्यू!
गुजरातमध्ये अपघातात सात भाविकांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाात तिघांचा मृत्यू


गाझियाबाद : रील बनवणे एका तरूणीच्या जीवावर बेतले आहे. गाझियाबादमध्ये रील बनवताना बाईकवर स्टंट करत असलेल्या एका तरुणीचा डिव्हायडरला धडकून मृत्यू झाला. तरुणी भरधाव वेगाने बाईक चालवत होती, तर मागे बसलेला तरुण मोबाईलने व्हिडिओ शूट करत होता. याच दरम्यान बाईक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. वेव्ह सिटी परिसरात आयएमएस कॉलेज उड्डाणपुलाजवळ घडली. तरुणी बाईक चालवत असतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. तरुणाची ओळख हाशिम (20) आणि तरुणीची इकरा (19) अशी झाली आहे. दोघेही गाझियाबादच्या पसौंडा मोहल्ल्याचे रहिवासी होते.

COMMENTS