Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

‘एसी’ने भरलेला कंटेनर चोरी करणारी टोळी जेरबंद; पारनेर पोलिसांची धाराशिवमध्ये कारवाई ;  ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पारनेर पोलिसांची धाराशिवमध्ये कारवाई ;  ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त सुपा : एमआयडीसीतील म्हसणे फाटा येथील करिअर मायडिया इंडिया कंपनीचा एसीने भरलेला कंटेनर चोरी करणाऱ्या टोळीला सुपा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे ३५ लाख रुपयांचे ३२१ एसी बॉक्स जप्त करण्यात आले असून कंटेनर व पिकअप वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास करिअर मायडिया इंडिया कंपनीतून ड्रायव्हर सर्जेराव दत्तू शिंदे (रा. जामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे कंटेनर (क्र. एमएच १२, पीक्यू ६०१०) मधून अंदाजे ४७ लाख ३९ हजार ४१४.५५ रुपये किमतीचे एसी घेऊन हैदराबाद येथे माल उतरविण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांनी सदर कंटेनर हैदराबाद येथे न नेता कर्नाटक राज्यातील गुलबर्गा परिसरात नेऊन त्यातील एसी माल चोरी करून कंटेनर तेथील पेट्रोल पंपावरउभा करून फरार झाल्याची बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी फिर्यादी मनीष सतीश शर्मा (वय ३७, रा. खराडी, पुणे) यांच्या तक्रारीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुपा पोलिसांनी धाराशिव येथून तिघांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नाईक सतीश बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे  यांनी केली. सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तत्काळ पथक नेमून तपास सुरू केला. तपासा दरम्यान चोरीचा माल व आरोपी धाराशिव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुपा पोलीस पथकाने धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेला संपर्क केला. त्यानंतर सुपा पोलीस व धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्तरित्या सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. सोनू अशोक पठारे (वय २१, रा. गोलेगा ता. भूम, जि. धाराशिव), गंगाराम मुबाराव पवार(वय २१, रा. ढोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव), भिबीषण नाना काळे (वय २५, रा. डोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
विहिरीत नग्नावस्थेत आढळला मृतदेह 
किनवटमधील गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई; दोन सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार

पारनेर पोलिसांची धाराशिवमध्ये कारवाई ;  ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सुपा : एमआयडीसीतील म्हसणे फाटा येथील करिअर मायडिया इंडिया कंपनीचा एसीने भरलेला कंटेनर चोरी करणाऱ्या टोळीला सुपा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे ३५ लाख रुपयांचे ३२१ एसी बॉक्स जप्त करण्यात आले असून कंटेनर व पिकअप वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.

७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास करिअर मायडिया इंडिया कंपनीतून ड्रायव्हर सर्जेराव दत्तू शिंदे (रा. जामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे कंटेनर (क्र. एमएच १२, पीक्यू ६०१०) मधून अंदाजे ४७ लाख ३९ हजार ४१४.५५ रुपये किमतीचे एसी घेऊन हैदराबाद येथे माल उतरविण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांनी सदर कंटेनर हैदराबाद येथे न नेता कर्नाटक राज्यातील गुलबर्गा परिसरात नेऊन त्यातील एसी माल चोरी करून कंटेनर तेथील पेट्रोल पंपावरउभा करून फरार झाल्याची बाब उघडकीस आली होती.

याप्रकरणी फिर्यादी मनीष सतीश शर्मा (वय ३७, रा. खराडी, पुणे) यांच्या तक्रारीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुपा पोलिसांनी धाराशिव येथून तिघांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नाईक सतीश बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे  यांनी केली.

सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तत्काळ पथक नेमून तपास सुरू केला. तपासा दरम्यान चोरीचा माल व आरोपी धाराशिव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुपा पोलीस पथकाने धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेला संपर्क केला. त्यानंतर सुपा पोलीस व धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्तरित्या सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. सोनू अशोक पठारे (वय २१, रा. गोलेगा ता. भूम, जि. धाराशिव), गंगाराम मुबाराव पवार(वय २१, रा. ढोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव), भिबीषण नाना काळे (वय २५, रा. डोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

COMMENTS