Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण

पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालय मध्ये 14 फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यात झालेल्या सीआरपीफ जवानांना राष्ट्रीय

कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान
‘अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा’ I LOKNews24

पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालय मध्ये 14 फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यात झालेल्या सीआरपीफ जवानांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये जवळजवळ सीआरपीएफ मधील 40 जवान शहीद झाले होते .या शहीद जवानांची आठवण म्हणून या जवानांना महाविद्यालयामध्ये मध्ये 40 कॅण्डल पेटऊन व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. खर्‍या अर्थाने आजचा दिवस देशाच्या दृष्टीने काळा दिवस आहे. असे भ्याड हल्ले आपण सर्व सुजान नागरिकांनी रोखले पाहिजेत असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे यांनी म्हटले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. पी.ढाकणे ,उपप्राचार्य डॉ.बी ए.चौरे ,एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.अजय कुमार पालवे ,डॉ. अशोक कानडे . प्रा.दत्तप्रसाद पालवे,डॉ.किरण गुलदगड डॉ.अरुण राख प्रा.आनंद घोंगडे , डॉ. अभिमन्यू ढोर मारे ,डॉ.अर्जुन केरकळ प्रा.ब्रह्मानंद दराडे आदी प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे ,भारत मातेचा विजय असो अशा विविध घोषणा देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

COMMENTS