Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.चिखलीकर यांच्या हस्ते ’हर घर जल’ योजनेचा बेंद्रीत शुभारंभ

नायगाव प्रतिनिधी - ग्रामपंचायत बेंद्री ता.नायगाव येथे जल जीवन  मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचा भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम व नांदेड जिल्ह्याचे खा. प

मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या
पिएम स्वनिधी योजनेतून नांदेड शहरातील फेरीवाल्यांना मिळाली उभारी
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 

नायगाव प्रतिनिधी – ग्रामपंचायत बेंद्री ता.नायगाव येथे जल जीवन  मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचा भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम व नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती बेंद्री नगरीचे सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा बेंद्री नगरीचे सरपंच युवा नेते सचिन पाटील बेंद्रीकर यांच्या पुढाकारातून बेंद्री गावाच्या महत्त्वपूर्ण पाणी प्रश्न सोडण्याच्या उदात्त दृष्टिकोनातून या ’हर घर जल ’ या महत्वपूर्ण योजनेचा भूमिपूजन शुभारंभ व मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहोळ्याचे आयोजन कार्यक्रम शनिवार  दि. 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ठीक 06:00 वाजता करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार राम पाटील रातोळीकर,  भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राजेश देशमुख कुंटूरकर, प्रणिता ताई देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे,  बालाजी बच्चेवार,  आशोक पाटील मुगावकर, माणिकराव पाटील शिंदे माणिक लोहगावे, कोंडीबा पाटील शिंदे, शंकर पाटील कल्याण देविदासराव बोंमनाळे, दिलीपराव धर्माधिकारी,भगवानराव लंगडापुरे, प्रविण बियाणी, प्रविण बियाणी,  उमाकांत राव देशपांडे,  विनायकराव पाटील शिंदे,  प्रभावती कत्ते, पांडुरंग पाटील शिंदे,  गजानन पाटील चव्हाण, व्यंकटराव पाटील चव्हाण,  धनराज शिरोळे,  भाऊ पाटील चव्हाण,  गंगाधर पाटील कल्याण,  कुमुद पटेल,  शिवा गडगेकर, माधव पाटील कल्याण,  डॉ .जिवन चव्हाण, चंदू पाटील चव्हाण, नागेश पाटील कल्याण, राजू अप्पा बेळगे, एजाज सय्यद , आदींसह अनेकांची उपस्थिती कार्यक्रम सोहोळ्यात राहणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान बेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर यांनी केले आहे.

COMMENTS