Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत ऊस तोडणी करतांना आढळले बिबट्याचे चार बछडे

बिबट्याचा संचार असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

राहुरी ः ऊस तोडणी करत असताना बिबट्याचे चार नवजात बछडे आढळल्याची घटना जोगेश्‍वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात येथे उघडकीस आली. चार नवजात

शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात दलालाकडून लूटमार
पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू
पत्नीला चक्क पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना| LOK News24

राहुरी ः ऊस तोडणी करत असताना बिबट्याचे चार नवजात बछडे आढळल्याची घटना जोगेश्‍वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात येथे उघडकीस आली. चार नवजात बछडे असल्याने आसपास बिबट्याचा संचार असल्याने शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात जोगेश्‍वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी थांबविण्यात आली. बुधवारी सकाळी विठ्ठल भाऊराव शेटे यांच्या  सर्वे नंबर 264 मध्ये ऊसतोड कामगार तोडणी करत असताना बिबट्याचे 4 बछडे कामगारांना दिसली. त्यांनी विठ्ठल शेटे यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वनविभागास कळविले असता वनविभागास खबर दिली. वनविभागाचे वामन लांबे, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन 4 बछडे ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान 4 बछडे असल्याने या ठिकाणी मादीचा वावर असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी मारुती हारदे, गणपत हारदे, अजय शेटे, नंदकुमार चोथे, भारत करजूले, भगवान म्हसे, गणपत भुजाडी, प्रमोद शेटे, बाबासाहेब गाडे, गणेश गायगाये आदिंसह शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान उसाचे शेत हे बिबट्याचे प्रमुख निवासस्थान झाले असून गेल्या काही दिवसात ऊस तोडणी करताना बिबट्याचे बछडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस तोड कामगार मजुरांनी ऊस तोडणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS